पुणे : पुण्याच्या भाजपच्या चक्का जाम आंदोलनात नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. परत द्या परत द्या ओबीसी आरक्षण परत द्या, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे. छोट मन ठेवून तुम्ही काहीही मिळवणार नाही, नशिबाने तुम्ही सरकारमध्ये आलात, पुन्हा जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही. मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका, संघर्षाची भावना तुटू देऊ नका, ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशार देखिल पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
आंदोलनाला राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेसह, ओबीसी आघाडी प्रदेश अध्यक्ष योगश टिळेकर, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच पक्षाचे इतर आमदार आणि नगर सेवक उपस्थित आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात १ हजार ठिकाणी भाजपकडून २६ जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
सरकारचे डोळे उघडले नाही तर वारंवार आंदोलन करावं लागेल!
पुण्यातील कात्रज येथिल आंदोलना दरम्यान पंकजा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या. पी़डितांचा वाली होण्यासाठी मुंडेसाहेब राजकारणात आले, त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहे. सरकारमधील मंत्री आंदोलनाची भाषा करतात हे तुम्हाला शोभतं का?, असे सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही आंदोलन केलं नाही. यांनी ५० टक्क्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सुरु असताना या सरकारने ५० टक्क्यांच्या आतलंही आरक्षण संपुष्टात आणलं आहे.या सरकारला लाज वाटली पाहिजे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
Read Also :
- अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
- ठाकरे सरकरने राज्यात लागू केले पुन्हा निर्बंध; राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- राज्यातील शाळा-कॉलेज कधी उघडणार? गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
- भाजपच्या बड्या माजी केंद्रीय मंत्र्याने साधले टायमिंग, केला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका १९ जुलै रोजीच होणार!