पुणे : माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी, आज राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राजकारणात येण्याआधी ते युती कार्यकाळात मंत्री राहिलेल्या भाजपचे नेते महादेवराव शिवणकर, यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पहिले होते. याच दरम्यान शिवसेनेने त्यांना १९९८ मध्ये, रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. यात त्यांनी काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव केला, १९९९ मध्ये त्यांनी पुन्हा श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बनले.
मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
त्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यांनतर, काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद व काँग्रेसचे प्रवक्तापद बहाल केले. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारीही जाहीर झाली. परंतु, नशिबाने आडवे लावले आणि त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच फिरत राहिल्याने ते मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, वेळेवर पोहचू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी जळगावच्या श्रीमती जैन यांना उमेदवारी दिली गेली आणि त्या आमदार झाल्या. यानंतरही काँग्रेसने त्यांना, रामटेक विधानसभेची २ वेळा उमेदवारी दिली. मात्र, दोन्ही वेळेला त्यांचा पराभव झाला.
अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…