ठाणे : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत आहे. ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतली.
भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात १ हजार ठिकाणी भाजपकडून २६ जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही २६ जून रोजी आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलंय.
मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. काही सेकंदच पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. या नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आज सकाळी ठीक १० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली त्या आधी ९ वाजल्यापासून भाजपा कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमायला सुरुवात झाली होती. १० च्या सुमारास प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी चक्का जाम आंदोलनलाला सुरुवात केली आणि लगेच पोलिसांनी अवघ्या काही सेकंदात आंदोलकांना ताब्यात घेतले.
Read Also :
- ठाकरे सरकरने राज्यात लागू केले पुन्हा निर्बंध; राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- राज्यातील शाळा-कॉलेज कधी उघडणार? गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
- भाजपच्या बड्या माजी केंद्रीय मंत्र्याने साधले टायमिंग, केला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका १९ जुलै रोजीच होणार!
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी