पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुणे-मुंबई जुना महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमा झाले आहेत.
अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
दरम्यान, ‘ओबीसी’ आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पुण्यातील शाहु कॉलेज येथे छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलनाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सरकारचे डोळे उघडले नाही तर वारंवार आंदोलन करावं लागेल!
आंदोलनाला राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेसह, ओबीसी आघाडी प्रदेश अध्यक्ष योगश टिळेकर, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच पक्षाचे इतर आमदार आणि नगर सेवक उपस्थित आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात १ हजार ठिकाणी भाजपकडून २६ जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
Read Also :
- समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
- अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
- ठाकरे सरकरने राज्यात लागू केले पुन्हा निर्बंध; राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- राज्यातील शाळा-कॉलेज कधी उघडणार? गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
- भाजपच्या बड्या माजी केंद्रीय मंत्र्याने साधले टायमिंग, केला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश