नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत असून, राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून हे, चक्का जाम आंदोलन आज राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
दरम्यान, चक्का जाम आंदोलनासोबतच भाजपकडून राज्यभरात जेलभरो आंदोलन देखील करण्यात येत आहे. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे, याचवेळी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना ताब्यात घेतले असून, आंदोलनातला जोर कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या अटकेनंतरही या आंदोलनातला जोर तसूभरही कमी झालेला पाहायला मिळालेला नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स; अकरा वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
राज्यभरातल्या महत्वाच्या शहरात ही आंदोलनं भाजप नेत्यांच्या नेतृत्वात केली जात असून, परळीतल्या आंदोलनाचं नेतृत्व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केलं. परळी शहरातील इटके कॉर्नर चौका मध्ये हे चक्का जाम आंदोलन चालू आहे, “या आंदोलनानंतर सरकारचे डोळे उघडले नाहीत, तर आम्हाला पुन्हा सरकारचे डोळे उघडण्यासाठी वारंवार आंदोलनं करावी लागतील,” असं खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
भाजपाकडून राज्यभरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलनास सुरुवात
मुंबईमध्ये भाजप नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ओबीसींचे पूर्वीचे आरक्षण परत दिलं नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. मात्र, त्यांनी आंदोलनाला सुरुवात करताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच, मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. काही सेकंदच पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. या नंतर पोलिसांनी आंदोलकांना आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
सरकारचे डोळे उघडले नाही तर वारंवार आंदोलन करावं लागेल!
पुण्याच्या भाजपच्या चक्का जाम आंदोलनात नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. परत द्या परत द्या ओबीसी आरक्षण परत द्या, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे. छोट मन ठेवून तुम्ही काहीही मिळवणार नाही, नशिबाने तुम्ही सरकारमध्ये आलात, पुन्हा जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही. मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका, संघर्षाची भावना तुटू देऊ नका, ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशार देखिल पंकजा मुंडे यांनी दिला आहे. आंदोलनाला राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेसह, ओबीसी आघाडी प्रदेश अध्यक्ष योगश टिळेकर, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच पक्षाचे इतर आमदार आणि नगर सेवक उपस्थित होते.
Read Also :
- यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
- “खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीला काँग्रेसने लावले ‘गालबोट’
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात
- समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
- अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक