मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज, मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “प्रताप सरनाईक यांच्याबद्दल लवकरच तुम्हाला बातमी मिळेल,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. “मी सरनाईकांशी २ दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो, त्यांनी सगळा खुलासा माझ्याकडे केला असून, मीही माझ्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, “मी आजन्म शिवसेनेतच आहे आणि मरेपर्यंत शिवसेनेतच राहीन,” असेही त्यांनी सांगितले.
यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
“त्यांच्यावरच्या कारवाईवर आमचं लक्ष आहे. कदाचित केंद्रीय पातळीवर दबाव असू शकतो. मात्र आज मी सरनाईकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोघांनाही आम्हाला जाणवलं, काही केंद्रीय यंत्रणा जाणुनबुजून ‘वडाचं साल पिंपळाला’ लावण्याच प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, राज्यातील जनतेने या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे सांगत, “दोन राजकीय नेते जेव्हा भेटतात, तेव्हा त्या भेटीची चर्चा ही होतेच. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला सक्षमपणे गती देत आहेत. त्यामुळे, कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरीही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील हे सरकार, आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,” असा दावा त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही
तसेच, यावेळी तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “शिवसेना-काँग्रेस आघाडीत असावी, असं पवार म्हणाले त्यात काही चूक नाही. आज ना आम्ही यूपीएमध्ये आहोत ना एनडीएमध्ये. त्यामुळे, देशपातळीवर विरोधी पक्षांची भक्कम आघाडी, भाजपला पर्याय म्हणून उभी राहात असेल, तर पवारांच्या भूमिकेत काहीच चूक नाही,” असा म्हणत त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना समर्थन दिले आहे.
Read Also :
- पिंपरीत पंकजा मुंडे, महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न
- जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार? – छगन भूजबळ
- खोटा कळवळा आणून राज्यात चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांनो, “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!”