नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत, हे सर्वांना माहित आहे. परंतू, जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबकोण बघणार?, असा सवाल राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भूजबळ यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्रातलं पहिलं राज्य आहे. ओबीसी खात्याची जबाबदारी पहिल्यांदाच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली आहे. आम्ही जेव्हा अहवाल मांडला तेव्हा आमचे अहवाल कचऱ्याच्या पेटीत फेकून दिले, अशी खंतही भूजबळांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात १ हजार ठिकाणी भाजपकडून २६ जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही २६ जून रोजी आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलं आहे.
यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले असून, यावरून राज्यातला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यातच आता निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला असून, त्यामुळे हा मुद्दा अजूनच चिघळला गेला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात
त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी आरक्षणाबाबत खंत व्यक्त केली आहे. आरक्षणाची लढाई स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरु झाली. ती आजंही सुरुच आहे. ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्रातलं पहिलं राज्य आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचे श्रेय घ्यावे आणि त्यांनी नेतृत्व कराव, मात्र समाजाची दिशाभूल करू नये असेही भूजबळांनी सांगितले आहे.
Read Also :
- खोटा कळवळा आणून राज्यात चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांनो, “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!”
- यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
- “खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीला काँग्रेसने लावले ‘गालबोट’
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात
- समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे