नागपूर : महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नाराजी अनेकदा उघडपणे समोर आली आहे. यातच, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबतच, आगामी सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार” असा सातत्याने नारा देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.
अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पक्षबांधणी आणि निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठी नाना पटोले दौरे करत होते. मात्र, मध्यातच त्यांना दौरा अर्धवट सोडून, दिल्लीला जावे लागले. काँग्रेसची महत्वाची बैठक दिल्लीत बोलावली गेली होती. मात्र, यांनतर त्यांनी स्वबळच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेतली असून, “राज्यातील जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यावेळची स्थानिक परिस्थिती आणि गरज पाहून कशा लढवायच्या हे ठरवण्यात येईल,” अशी भूमिका त्यांनी, एका वर्तमानपत्राशी बोलताना मांडली आहे.
समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
तसेच, “लोकसभेच्या निवडणुकांना वेळ आहे. त्यामुळे आत्तापासूनच स्वबळाचा काही विषय नाही. काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल व महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत देखील स्वबळाचा विषय नव्हता. या बैठकीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे काय धोरण असावे, याबद्दल सविस्तर चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे. मात्र, लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यावेळी या निवडणुकांत त्यावेळची स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. जिथे गरज आहे, तिथे आघाडी करू, जिथे स्वबळावर लढायची गरज पडेल, तिथे स्वतंत्र लढू”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Also :
- खोटा कळवळा आणून राज्यात चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांनो, “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!”
- देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही
- यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
- “खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीला काँग्रेसने लावले ‘गालबोट’
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात