पिंपरी चिंचवड : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर विविध मागण्या करीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन चक्काजाम करण्यात आले. दरम्यान पंकजा मुंडे यांच्यासह आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पार्टी पुणे आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे सकाळी कात्रज चौक येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यानंतर त्यांनी पिंपरीतही चक्काजाम आंदोलन केले. ओबीसी संघटना व समाजबांधव सहभागी झाले. दरम्यान कार्यकर्त्यांनी गर्दी करत सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केले.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात
”महाराष्ट्र राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी…ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो… रोहिणी आयोगाशी चर्चा करण्यासाठी त्वरीत समिती गठीत करा…” अशा घोषणा देत विविध मागण्या करीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यांने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे.”सरकार महिन्यांपासून वेळकाढू पणा करतेय, आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही” अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली आहे.
समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध भागात चक्काजाम आंदोलन घेण्यात येत आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपद्वारे राज्यात जेल भरो आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सच्या नियमांची पायमल्ली होत आहे.
Read Also :
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही
- यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
- “खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीला काँग्रेसने लावले ‘गालबोट’
- समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे