मुंबई : काल राज्याच्या माजी गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुखांवर ईडीने मोठी कारवाई केली. देशमुखांच्या मुंबई आणि नागपूरामधील घरावर काल सकाळपासून, सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले. तसेच, घराची झाडाझडती घेतली आणि नातेवाईकांची चौकशी केली. तसेच, काल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांना ईडीने ताब्यात घेतल्यांनंतर, डीसीपी राजीव भुजबळ आणि सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला. त्यात बार मालकांनी ३ महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली ईडीला दिली.
सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
दरम्यान, ईडीकडून देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना, शुक्रवारी रात्री उशिरा, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अटक केली गेली असून, त्यांना आज सकाळी ११ वा. न्यायालयात हजर केले गेले आहे. त्यांची, न्यायमूर्ती डॉ. यू. जे मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु असून, वकील शेखर जगताप संजीव पालांडे यांची, तर कुंदन शिंदेंची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर मांडत आहेत. ईडीच्या बाजूने वकील सुनिल गोंसावलीस बाजू मांडत असून, त्यांनी दोघांची ७ दिवसांच्या ईडीच्या कोठडीची मागणी केली आहे.
“प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल”- संजय राऊत
यावेळी, “PMLA ACT 50 नुसार देशमुखांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. याच कायद्यांतर्गत, आणखीही काही जणांचे जबाब इडीने नोंदवले आहेत. तसंच सीबीआयने दाखल केलेल्या एफआयर अंतर्गत ईडीने इसिआर रजिस्टर केला आहे. ही कागदपत्रे सार्वजनिक कागदपत्रे नसतात. इसिआर दाखल केल्यावर, आम्ही चौकशीसाठी आरोपींना समन्स केले होते. संजीव पालांडे हा अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक आहे, तर कुंदन पालांडे हा अनिल देशमुख यांचा असिस्टंट आहे. हे बार मालकांकडून पैसे काढायचे असा आरोप यांच्यावर आहे,” अशी माहिती वकिलांनी दिली.
मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
तसेच, सचिन वाझेने डिसेंबर महिन्यात ४० लाख रुपये, गुडलक म्हणून संजीव पालांडेला दिले होते. मुंबई पोलीस परिमंडळ १ ते ६ आणि ७ ते १२ या १२ भागांतून मिळून सचिन वाझेनं ४ कोटी ८० लाख रुपये गोळा केले होते. वाझेने ६० बार मालकांकडून पैसे वसूल केले, असा दावा वकिलांनी न्यायालयात केला आहे. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्याकरता हे पैसे गोळा करण्यात आले असल्याचे, जया शेट्टी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे.
ईडीच्या कारवाईनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; देशमुख म्हणतात…
दुसरीकडे, सचिन वाझेने देखील त्याच्या जबाबात यांचा उल्लेख केला असून, ACP संजय पाटील आणि एक पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या जबाबानुसार, अनिल देशमुख यांचे पीए संजीव पालांडे यांनी, त्याला बार मालकांकडून पैसे गोळा करायला सांगितले, असं ईडीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. त्यामुळे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना PMLA ACT अंतर्गत अटक केली आहे. त्यांची अजून चौकशी करणे बाकी आहे. या प्रकरणी आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे, याबाबत चौकशी करायची असल्याचं सुनिला गोंसावलीस यांनी न्यायालयात म्हटलं आहे.
Read Also :
- पिंपरीत पंकजा मुंडे, महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न
- जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार? – छगन भूजबळ
- खोटा कळवळा आणून राज्यात चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांनो, “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!”