मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपत, आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरु असून, या वादात आता भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्यांनी, फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला असून, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा घेत त्यांनी, राऊत यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. “राऊत शिवसेनेचं खातात आणि जागतात पवारांना. त्यांच्यासारख्या नेत्याची धनगर समाजाला अजिबात आवश्यकता नाही. मुळातच राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडणं लावून दिली. दस्तलेखक म्हणून भावाचा राजीनामा तयार केला, तो यांनीच,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“…तर मी राजकारणातून संन्यास घेईन”, फडणवीसांचं ठाकरे सरकारला थेट आव्हान
तसेच, “आता शरद पवारांच्या सांगण्यावरून हे सामनाच्या रोखठोक सदरात, पुण्याचे बिल्डर अविनाश भोसले, अजित पवारांच्या किती जवळचे आहेत हे सांगतील. एकाप्रकारे त्यांनी, काकांच्या सांगण्यावरून पुतण्याच्या पाठीमागे फटाके लावण्याचेच काम केले आहे,” अश्या शेलक्या शब्दांत जहरी टीका केली आहे.
“एकमेकांच्या चुका काढून दाखवण्यापेक्षा एकत्र येऊन लढा उभारू”, वडेट्टीवारांचे विरोधकांना आवाहन
‘जे आदिवासींना तेच धनगरांना’ यानुसार, युती सरकारच्या काळात धनगरांसाठीच्या योजनेला १००० कोटी रुपये मंजूर केले गेले होते. मात्र, यातला एक रुपयाही ठाकरे सरकारने धनगरांना दिला नाही. ओबीसी आरक्षणासाठी युती सरकारने २३ जीआर काढले होते. राऊत यांना याबाबत काहीच माहिती नाही. या सरकारने त्याची अमंलबजावणी तर सोडाच, दिलेला निधीही परत घेतला,” असा आरोपही पडळकरांनी केला आहे.
Read Also :
- “सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही”
- आंबिल ओढा प्रकरण : महापालिका आयुक्त फडणवीसांच्या भेटीला! महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण
- आता आमदार-खासदार होऊ शकणार नाहीत नागरी बँकांचे संचालक, आरबीआयचा आदेश; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
- “छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता”
- ओबीसी आरक्षण: जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?