लोणावळा : ओबीसी आऱक्षणाच्या मुद्द्यावरून आज भाजपने राज्यभरातल्या विविध महत्वाच्या शहरांमध्ये चक्का जाम आणि जेल भरो आंदोलन केलं. याला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यातही घेतले. मात्र, तरीही आंदोलनाचा जोर कमी झाला नाही.
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून बदलणार नियम; वाचा नवीन नियमावली
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडूनही आज लोणावळा इथे, ओबीसी मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक ओबीसी नेते आणि मंत्री उपस्थित होते. या शिबिराच्या प्रमुख स्थानी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ हे मंत्री आणि ओबीसी नेते होते.
यावेळी, या शिबिरात विजय वडेट्टीवार यांनी आपली भुमिका मांडली. ते या मंथन शिबिराला संबोधीत करताना म्हणाले, “राजकीय पक्ष कुठलंही आंदोलन शक्ती मिळवण्यासाठी करतात, आपल्या पक्षाची ताकद वाढावी म्हणून करतात. मात्र, सामाजिक संघटना जे आंदोलन करतात ते समाजाच्या हितासाठी करतात. त्यात एक प्रकारची विश्वासार्हता असते,” असं ते म्हणाले.
जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार? – छगन भूजबळ
तसेच, आम्ही आमच्या काळात अनेक आंदोलने भाजपाच्या विरोधात केली. त्या सगळ्याचा अर्थ वडेट्टीवार काँग्रेसची भुमिका मांडतात, हाच निघेल. तसेच, आज भाजप जे आज आंदोलन करत आहे. त्याचा अर्थ ते आघडी सरकार विरोधात आहेत, असा निघेल. त्यामुळे या आंदोलनांच्या अर्थांपलीकडे जाऊन हा विषय चर्चेला आणायला पाहिजे. त्यासाठी एकामेकांकडे बोटे न दाखवता सर्वांनी एकत्र येऊन हा लढा समाजासाठी दिला पाहिजे, तेव्हा हा आरक्षणाचा प्रश्न आणि इतर प्रश्न मार्गी लागतील,” असं म्हणत त्यांनी भाजपला एकत्र येऊन या मुद्द्यावर काम करण्याचे आवाहन केले आहे.
Read Also :
- “ही वेळ सरकारने आमच्यावर आणली” फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
- न्यायालयात ईडीकडून केले गेले मोठे खुलासे, देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!
- रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी
- “प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल”- संजय राऊत
- पिंपरीत पंकजा मुंडे, महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात