जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले असून, यावरून राज्यातला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यातच आता निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला असून, त्यामुळे हा मुद्दा अजूनच चिघळला गेला आहे.
पिंपरीत पंकजा मुंडे, महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान, यावरून एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी, विरोधी पक्षाने राज्य सरकारच्या निषेधार्थ, आज भाजपच्या वतीने आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. यावरून अनेक आघडी सरकारमधल्या अनेक नेत्यांनी भाजपवर टीका केली असून, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे.
“संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
“एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण भाजपने सांगावे,” असा सवाल ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
ते आंदोलन करतांना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना..@BJP4Maharashtra@NCPspeaks
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 26, 2021
जळगाव जिल्ह्यात भाजपने ओबीसींचा चेहरा म्हणून, खासदार रक्षा खडसे यांच्याकडे नेतृत्व दिले आहे. आज त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात खडसे विरूद्ध खडसे हा सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे. रोहिणी खडसे यांनी काही दिवसांपूर्वीही भाजपवर ट्विट करत निशाणा साधला होता. “भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता ? आता गळा काढण्यात अर्थ नाही,” असं ट्विट त्यांनी केलं होतं.
Read Also :
- रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी
- न्यायालयात ईडीकडून केले गेले मोठे खुलासे, देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!
- सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
- “प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल”- संजय राऊत
- परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न