पुणे : रत्नागिरीत राज्यातल्या नवीन ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला असून, मृत ८० वर्षांची महिला संगमेश्वरमधील रहिवासी होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती काल प्रसार माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, यानंतर तातडीने राज्यात या नवीन ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचा धोका वाढत असल्यामुळे, पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, याबाबत राज्य सरकारने नवीन नियमावली किंवा शासन आदेश काढला आहे.
ठाकरे सरकरने राज्यात लागू केले पुन्हा निर्बंध; राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
या पार्श्वभूमीवर पुण्यात देखील निर्बंधात थोडासा बदल झालेला असून, पुणे महापालिकेने देखील नवीन नियमावली जाहीर कलेची आहे. आज याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामारी आढावा बैठकीत देखील, निर्बंध कडक करण्यावर चर्चा करण्यातली होती.
या नवीन नियमावलीनुसार….
- सर्व प्रकारची दुकाने दु.४ पर्यंत सुरु राहणार.
- मॅाल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर पूर्णतः बंद.
- विकेंड लॉकडाऊन कायम.
- शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद.
- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट : सोम.-शुक्र. दु. ४ पर्यंत ५० % क्षमतेने सुरू राहणार. त्यानंतर आणि शनि-रवि रा. ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा/घरपोच सेवांना परवानगी.
- सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने (चालणे व सायकलिंग) सर्व दिवस स. ५-९ वाजेपर्यंत सुरु राहतील. (याच वेळेत आऊटडोअर खेळ खेळण्यास परवानगी)
- व्यायामशाळा ४ पर्यंत ५ दिवस सुरू राहतील.
- ई-कॉमर्स, कृषी संबंधी सर्व सेवा-व्यवसाय सुरू राहणार.
- सं. ५ नंतर जमावबंदी आणि संचारबंदी.
- सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, लग्न व मनोरंजन कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत घेता येणार. (सोम-शुक्र दु. ४ पर्यंत आणि ३ तासांचे करण्यास परवानगी)
- सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद. (दैनंदिन पूजा/अर्चना करण्यास परवानगी)
- अंत्यसंस्कार, दशक्रिया आणि संबंधित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी)
- बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल, तिथे बांधकाम सुरु ठेवता येणार. बाहेरून येणारे कामगार असल्यास, त्या बांधकामांना दु. ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.
- पीएमपीएमएमएल आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने सुरु राहील.
- माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी
- खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी (लेव्हल ५ मधील ठिकाणी थांबणार असल्यास ई-पास बंधनकारक)
- अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळीला परवानगी.
- पालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था १५ जुलै २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील.
- सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था पूर्णतः बंद राहतील.
- मद्य विक्रीची दुकाने सोम-शुक्र दु. ४ वाजेपर्यंत सुरु (शनि-रवि होम डिलिव्हरी सुविधा)
Read Also :
- “ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम करणाऱ्या भाजपने, पक्षातल्या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?”
- रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी
- न्यायालयात ईडीकडून केले गेले मोठे खुलासे, देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!
- सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री