पुणे : पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. ओढ्यालगत असलेल्या जेसीबीच्या सहाय्याने घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यांनतर, या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध झाला. यावेळी अनेकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसेच, या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले.
आता आमदार-खासदार होऊ शकणार नाहीत नागरी बँकांचे संचालक, आरबीआयचा आदेश; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
दरम्यान, यावरून सध्या पुण्याचे आणि महापालिकेतले राजकारण चांगलेच तापले आहे. ज्या बिल्डरचे या वादात नाव घेतले जात आहे, तो उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयातला असल्याच्या चर्चा आहेत. यातच, आता पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने, महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी
महापालिका आयुक्तांनी फडणवीसांची घेतलेली ही भेट, आंबिल ओढा प्रकरणावरून होती, की याला आणखी संदर्भ होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. एकीकडे ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेने पुरेसा वेळ दिला आहे. यानानंतरही या कारवाईला नागरिकांकडून विरोध होत आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे, तर बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा नागरिकांनी केला आहे.
मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं; महापौरांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
तसेच, भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढणं, पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेणं, पाडकाम यावरून राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होणंच शक्य नाही, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या फडणवीसांच्या या भेटीवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान, ही भेट अजितदादांच्या परवानगीशिवाय झाली आहे, की अजितदादांनीच आयुक्तांना यासंदर्भात त्यांच्याकडे जाण्यास सांगितले आहे, याचा देखील खुलासा होणे अजून बाकी आहे.
Read Also :
- “जनतेवर अन्याय करून, कोणताही विकास करता येणार नाही”- प्रविण दरेकर
- झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या
- आंबिल ओढ्यातील एकालाही बेघर होऊ देणार नाही; महापौर मुरली मोहोळ यांचे स्पष्टीकरण
- पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कडून स्थगिती
- आमची घरे तोडली.., आमच्या माणसांना पोलिस मारतायं.., आम्ही कुठे जायचं..- चिमुकला