प्रख्यात विचारवंत अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या आणखी सोप्या शब्दात मांडली, ते म्हणतात लोकशाही म्हणजे लोकांद्वारे लोकांचे राज्य, जगभरातील लोकशाहीला चालना देणे हे या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आज या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवसाचा इतिहास आणि मह्त्व जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस 2007मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने सुरू केला होता. 2008 मध्ये प्रथम लोकशाही दिवस साजरा करण्यात आला याअंतर्गत जगातील कानाकोपऱ्यात सुशासन लागू करणे आवश्यक आहे. यानंतर जिनिव्हा येथे संसदेत एक कार्यक्रम झाला यात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस साजऱ्या करण्यासाठी इंटर पार्लियामेंट्री युनियन स्थापित करण्यात आले . भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखले जाते कारण इथे ६० कोटी पेक्षा अधिक जनता आपल्या मतांचा वापर करून आपले सरकार निवडते.
जगभरात दोन प्रकारची लोकशाही आहे. एक म्हणजे संसदीय शासन आणि दुसरी म्हणजे राष्ट्रपती शासन, या दोन्ही प्रकरणात लोक आपल्या मतांचा वापर करून आपल्या देशाचा प्रतिनिधि निवडतात जो त्यांच्यासाठी काम करतो, त्यापार्शवभूमीवर भारत , कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये संसदीय कारभाराची व्यवस्था आहे तर अमेरिकेत राष्ट्रपती शासन आहे . राष्ट्रपती शासनामध्ये सगळे निर्णय राष्ट्रपती घेतात तर संसदीय शासनात राष्ट्रपतीकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसतात . लोकशाहीच्या काळात कोणतीही व्यक्ती जो सरकारच्या कामावर समाधानी नाही तो आपला मुद्दा सर्वांसमोर ठेवू शकतो व त्याच्या निषेध करू शकतो. दरम्यान दरवर्षी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवसाची एक थीम असते यावर्षी कोरोनाचे जगभरात सावट आहे. यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहे . त्यापार्शवभूमीवर लोकांचा जीव वाचवणे हि यंदाची थीम ठेवण्यात आली आहे .