आयुष्यं म्हटलं की संघर्षही न चुकता आलाच. या संघर्षाला मग वयाचे बंधन तरी कोठे आले हो. ज्या वयात कुटुंबातील छोट्या छोट्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवत तसेच देवाजीच्या नामस्मरणात घरात वेळ घालवायचा असतो तिथे एक आजीबाई दहा माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या हिमतीवर पार पाडत आहे. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील त्यावर मात करत तरुणांना लाजवेल अशी थरारक ‘कामगिरी’करत आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात या ८५ वर्षाच्या आजीबाई आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी तरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात काम केले. मात्र, आता ऊन , वारा, पाऊस एव्हाना कोरोनाकाळात देखील दोन वेळच्या अन्न पाण्यासाठी रस्त्यावर उतरुन मोठी कसरत करावी लागत आह. पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज या आजीची खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि एक लाखांची मदत आणि साडी भेट म्हणून दिली आहे.