मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रविण दरेकर प्रत्युत्तर यांनी दिले आहे. मागील काही दिवसापासून अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून टीका टिप्पणी चालू आहे.
बिहारमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यातील त्यांची भाषा निंदनीय असून, अब्दुल सत्तार यांच्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी.
सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने फेक अकाउंट आहेत. मात्र काही विशिष्ट अकाउंटवर सायबर विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून, सायबर विभागामार्फत सर्वच फेक अकाउंटवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
Read Also
राज्यात अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार !https://t.co/LsJr7R1Mwp#MahavikasAaghadi @raosahebdanve
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020