मुंबई : मागील काही दिवसापासून चर्चेत आलेला ड्रग्ज माफिया ललित पाटलाला अखेर पोलिसांनी चेन्नई येथे पकडले आहे. तब्बल पंधरा दिवसानंतर पोलिसांना हुलकावणी देत ललित पाटील फरार झाला होता. ललित पाटील याला पकडण्यासाठी पोलिसांचे १० पथके तैनात करण्यात आले होते. चेन्नई येथे असल्याची पोलिसांना टिप मिळाल्यानंतर चेन्नई गाठून ललित पाटलाच्या रात्रीच मुसक्या आवळल्या. अटक केल्यानंतर ललित पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…अजित पवारांची ‘त्या’ प्रकरणात आता चौकशी होणार, वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
ललित पाटील याला अटक करून आणल्यानंतर त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मी ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं आहे. या प्रकरणात कोण कोणाचा हात आहे. ते सर्व सांगणार. अशी प्रतिक्रिया ललित पाटीलनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कोण कोणाचा हात आहे. याची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“ठाकरे अन् शिंदेंमध्ये भांडणं लावून राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं”, कुणी केला हा मोठा गौप्यस्फोट ?
दरम्यान, ललित पाटील याची नार्को टेस्ट करा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. तर ललित पाटील जळगावमधील चाळीसगाव मध्ये कशासाठी गेला होता. धुळ्याला का गेला होता? असा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच नाशिकमध्ये पालकमंत्री असतांना याचे संबंध आले होते. असंही त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, मग अजित पवार गटाला किती जागा मिळणार ?
हेही वाचा…“ललित पाटीलचा जयसिंघानी होऊ नये, ‘या’ मोठ्या नेत्यांनी व्यक्त केली भिती”, प्रकरणात मोठ्या मंत्र्यांचा संबंध?
हेही वाचा…काकांचा सल्ला ऐकला…! ४० वर्षांपासूनचा राष्ट्रवादीचा निष्ठावंत माजी आमदार परतला
हेही वाचा…ड्रग्ज माफिया ‘ललित पाटला’च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा होता आशीर्वाद?
हेही वाचा…काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर, 500 रुपयांना गॅस सिलिंडर देणार