नवी दिल्ली : आगामी काळात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अलिकडेच निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यातच आता मध्यप्रदेशसाठी काॅंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
हेही वाचा…“चौकशी करा किंवा अन्य काही करा,फरक पडत नाही”, बोरवणकरांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले
भाजपची सत्ता उधळवून लावण्यासाठी मध्यप्रदेशात काॅंग्रेसने कंबर कसली आहे. कर्नाटक विधानसभेच्या यशानंतर आता मध्यप्रदेशात देखील काॅंग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा काॅंग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. यातच काॅंग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यात महिलांना १५०० रूपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गॅस सिलिंडर ५०० रूपये, १०० युनिट वीज सवलतीच्या दरात तर २०० युनिट अर्ध्या दराने दिली जाणार आहे. तसेच जात जनगणना करणार असल्याचंही काॅंग्रेसने म्हटलंय.
हेही वाचा…“ड्र्ग्जप्रकरणाबाबत नाशकात महत्वाची बैठक,” दादा भूसेंनी दिले कठोर कारवाई करण्याचे आदेश
दरम्यान, तेलंगणात देखील काॅंग्रेसने पाच गॅरॅंटी आश्वासने दिली आहेत. यातच छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम राज्याच्या विधानसभेसाठीही काॅंग्रेसने मोठी रणनिती आखली आहे. याचा निकाल नोव्हेंबर लागणार असून काॅंग्रेसने ही राज्ये जिंकलीत तर आगामी लोकसभा निवडणुकीत याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेश कांग्रेस का आस्था और विश्वास का वचन
“बढ़ाइये हाथ, फिर कमलनाथ” pic.twitter.com/Zilef9dbyB
— MP Congress (@INCMP) October 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांची ‘त्या’ प्रकरणात आता चौकशी होणार, वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
हेही वाचा…“ठाकरे अन् शिंदेंमध्ये भांडणं लावून राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं”, कुणी केला हा मोठा गौप्यस्फोट ?
हेही वाचा…लोकसभेसाठी अजितदादांसाठी रणनिती ठरली..! ‘या’ पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
हेही वाचा…जरागेंच्या अल्टिमेटला फक्त सात दिवस बाकी, मंत्रालयात मंत्र्यांची मोठी धावपळ
हेही वाचा…“दादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला टाकला की काहींना काही विघ्न येतातच”,आधी धरण अन् आता जमीन पाठ सोडेना