पुणे : येरवडा जमीन व्यवहाराप्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून धक्कादायक आरोप केले आहेत. बोरवणकर यांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळून लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते गजानन काळे यांनी अजित पवार यांच्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणावर विखे पाटलांचा तिखट वार, जरांगे पाटलांच्या ‘त्या’ भूमिकेवर घेतला आक्षेप
काल पत्रकार परिषद घेऊन मीरा बोरवणकर यांनी पुण्याच्या येरवडा तुरूंगाजवळील पोलीस दलाच्य ताब्यातील तीन एकराच्या मोक्याच्या जागेचा तत्कालीन दादा पालकमंत्र्यांच्या वतीने लिलाव करण्यात आला. या लिलावाप्रमाणे या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास मला पालकमंत्र्यांनी सांगितले होते. असं मीरा बोरवणकर यांनी सांगत अजित पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
हेही वाचा…“ठाणे कुणाचा गड? निवडणुका लागल्यानंतर कळेल,” राजन विचारेंनी शिंदेंना दिले आवाहन
त्यावर अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून दादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला टाकला की काहींना काही विघ्न येतातच. कधी धरण तर आता जमीन पाठ सोडेना. स्पष्टीकरण देऊन देऊन आमच्या बिचाऱ्या घासलेट चोराच्या पंपातलं घासलेट संपलं असं म्हणत टोला हाणला.
दादांनी मुख्यमंत्री पदाचा ‘ कोट ‘ शिवायला टाकला की काहीना काही विघ्न येतच …
कधी ‘धरण’ तर आता ‘जमीन’ पाठ सोडेना ..स्पष्टीकरण देवून देवून आमच्या बिचाऱ्या घासलेट चोराच्या पंपातल घासलेट संपलं …
— Gajanan Kale (@MeGajananKale) October 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“चौकशी करा किंवा अन्य काही करा,फरक पडत नाही”, बोरवणकरांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले
हेही वाचा…“ड्र्ग्जप्रकरणाबाबत नाशकात महत्वाची बैठक,” दादा भूसेंनी दिले कठोर कारवाई करण्याचे आदेश
हेही वाचा…“आमदार अपात्रतेप्रकरणी आता अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून शेवटची संधी”, वाचा संपूर्ण युक्तवाद
हेही वाचा…“नाही तर वेळापत्रक काढण्याचा आम्ही आदेश देऊ शकतो”, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारत दिला इशारा
हेही वाचा…“समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय”, वाचा सविस्तर