नगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सतरा दिवस बसलेल्या मनोज जरांगे पाटलांचा आता महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. सुरूवातीला जरांगे पाटलांनी मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर जालन्यात भव्य जाहीर सभा घेतली. यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यानंतर खेड येथील राजगुरूनगर येथे सभा होणार आहे. त्या आधी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे, अशी जाहीर भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे. त्यावर आता महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर, चंद्रकांत पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश”, हेमंत रासने
कोणत्याही समाजाच्या आरक्षणामध्ये आम्हाला भागिदारी नको आहे. आम्ही पहिल्यापासून मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षणासाठी मागणी करत आलो आहे. याआधीही मराठ्यांचे ५८ मोर्चे निघाले होते. त्या मोर्चेंमध्येही आम्ही हीच मागणी केली होती. मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण मिळावे, ही आमची पूर्वी भूमिका होती, आज आहे आणि उद्याही राहणार असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालय आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार
दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, नाहीतर ओबीसी मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. तर मराठ्यांना कोणत्याही समाजाच्या आरक्षणामध्ये भागिदारी नको, मराठ्यांना स्वातंत्र आरक्षण मिळावे अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.
हेही वाचा…“मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण? याचीही चौकशी व्हावी,” अजित पवारांसाठी नेते सरसावले
दरम्यान, मराठा समाज हा देशात सर्वात मोठा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. राज्यात देखील मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर लवकरात लवकर तोडगा काढणं महत्वाचं आहे. अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाणे कुणाचा गड? निवडणुका लागल्यानंतर कळेल,” राजन विचारेंनी शिंदेंना दिले आवाहन
हेही वाचा…“पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जागतिक सागरी क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, दिवाळीनंतर निकाल लागणार ?
हेही वाचा…“नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालावे,” मनोज जरांगे पाटलांची मागणी
हेही वाचा…“राहुल नार्वेकर चोरांना सरंक्षण देताहेत, त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात..,” राऊतांचा जोरदार घणाघात