मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. निवडणुक आयोगाच्या निकालाविरोधातील सुनावणी ३१ ऑक्टोंबर रोजी होणार होती, परंतु ही सुनावणी आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली असून कोर्टातली सुनावणी दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“आघाडी धर्म पाळण्यासाठी त्यांचं ऐकावं लागेल असं सांगण्यात आलं,” मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौफ्यस्फोट
निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी असून कोर्टाने हा निर्णय फिरवावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी आता नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे . सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. शिवाय केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आज पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी पुढे लांबणीवर गेली असून तीन आठवड्यानंतर होणार आहे.
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर,” उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी अपात्र आमदारांवरील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या दोन्ही याचिकांवर आज कोर्टात एकत्रित सुनावणी पार पडणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालावे,” मनोज जरांगे पाटलांची मागणी
हेही वाचा…“राहुल नार्वेकर चोरांना सरंक्षण देताहेत, त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात..,” राऊतांचा जोरदार घणाघात
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर, चंद्रकांत पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश”, हेमंत रासने
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालय आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार
हेही वाचा…“मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण? याचीही चौकशी व्हावी,” अजित पवारांसाठी नेते सरसावले