मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी अपात्र आमदारांवरील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या दोन्ही याचिकांवर आज कोर्टात एकत्रित सुनावणी पार पडणार आहे.
हेही वाचा…“सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापून व्यवसाय वाढवणाऱ्या अदानीला पंतप्रधानांचा पाठिंबा”
शिवसेना अपात्र आमदारांच्याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास विलंब लावत असल्याची तक्रार ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. यातच मागच्या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याप्रकरणावरून चांगलचं खडसावलं होतं. त्यानंतर अध्यक्षांनी सुनावणी घेतली होती. मात्र याप्रकरणाबाबत अद्यापही निकाल लागलेला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना अपात्र करा, अशी मागणी जयंत पाटील यांनी कोर्टात केली आहे. त्यामुळे कोर्ट आता या सुनावणीत काय निकाल देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“सुनावणीचं वेळापत्रक द्या, अन्यथा..,” कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चांगलचं फटकारलं
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई, अनिल परब उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. यातच मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणाबाबत आता सर्वोच्च न्यायालयात काय निकाल देणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती.यातच मागच्या वेळी सरन्यायाधीशांनी तोंडी म्हणाले होते की प्रकरणात गांभीर्य दाखवलं नाही तर दोन महिन्यांच्या आत निर्णय घ्या, असं आम्हाला सांगावं लागेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रकरणात वेळापत्रक द्यायला सांगितलं जाणार का ? याचीही उत्सुकता आता लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण? याचीही चौकशी व्हावी,” अजित पवारांसाठी नेते सरसावले
हेही वाचा…“आघाडी धर्म पाळण्यासाठी त्यांचं ऐकावं लागेल असं सांगण्यात आलं,” मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौफ्यस्फोट
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर,” उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला
हेही वाचा…“तेव्हा मी त्यांना नकार दिला,”अजितदादांवर आरोप करत मीरा बोरवणकरांनी सगळचं सांगितलं
हेही वाचा…मुंबई जिंकण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, ‘या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षपदी नियुक्ती