मुंबई : विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सांगा की सर्वोच्च न्यायलायच्या आदेशाचंही पालन करत जा. असं म्हणत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारप्रकरणाबाबत चांगलाचं फटकारलं आहे. सोमपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक दिलं नाही तर आम्ही त्यांना वेळापत्रक देऊ, असा थेट इशाराच कोर्टाने राहुल नार्वेकरांना दिला आहे. त्यावर आता राहुल नार्वेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ आता पुण्यात धडकणार, पुण्यात या ठिकाणी होणार जाहीर सभा
संविधानाला मानणारे नागरिक म्हणून आम्ही न्यायालयाच्या प्रत्येक प्रक्रियाचं पालन करू. मी सगळ्या न्यायालयांचा मान राखतो आणि सगळ्या न्यायालयाच्या आदेशांचं पालन करतो ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास असतो. संविधानावर विश्वास असतो त्यांनी संविधानाने स्थापन केलेल्या विविध संस्थांचा मान राखणं, आदर ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच कोर्टाच्या आदेशांचा आदर ठेवीन. पण विधिमंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचं सार्वभौमत्व कायम ठेवणं हे माझं कर्तत्व आहे. असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा…अजित पवार आणि शरद पवारांमधील वाद कसा मिटणार ? ‘या’ केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला जालीम उपाय
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेतांना दिरंगाई करत असल्याची तक्रार करत याचिका केली होती. त्यावर सुनावणी घेतांना कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं आहे. कोणत्या प्रकारचं वेळापत्रक ते न्यायालयाला सांगत आहेत. सुनावणीच्या वेळापत्रकाचा अर्थ सुनावणीत दिरंगाई करणे हा असू नये. नाहीतर विरोधी पक्षांची शंका बरोबर ठरेल. असंही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नमुद केले.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांकडून सरकारी जमीन विकण्याचा प्रयत्न”, माजी पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“एक घंटाही वेळ वाढवून देणार नाही,” अजितदादांच्या मागणीवर जरांगे पाटलांचा घणाघात
हेही वाचा…“फडणवीसांनी राजकीय क्षितीज मर्यादित केलं तरी..,”शेलारांवर शेलक्या शब्दात ‘कुणी’ केली टिका ?
हेही वाचा…दिवाळीपूर्वी मोठा राजकीय हादरा बसणार, मंत्र्यांच्या विधानाने खळबळ
हेही वाचा…“आपल्यासाठी घातक निर्णय घेणाऱ्या सरकारला घरी पाठवा,” शरद पवारांचं आक्रमकपणा पुन्हा जिंवत