पुणे : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटलांची मागील आठवड्यात जंगी सभा झाली. जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या सभेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सभेसाठी आले होते. या सभेत मनोज जरांगे पाटलांनी दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आता मनोज जरांगे पाटलांची पुढची सभा पुण्यात होत असून अनेक तरूण या सभेसाठी येणार असल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या! बावनकुळे यांच आवाहन तर महेश लांडगे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर बांधवांना आरक्षण मिळवून देईन, असं मनोज जरांगे पाटलांनी जालन्यातील सभेत म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी सरकारला २२ ऑक्टोंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर पुढची रणनीती ठरवणार आहे. यातच आता येत्या शुक्रवारी २० ऑक्टोंबर रोजी पुण्यातील खेड तालुक्यात मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा…ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार
दरम्यन, खेड तालुक्यातील गावागावामधील तरूण या साखळी उपोषणातत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. जरांगे पाटील यांची खेड तालुक्यातील ही सभा एतिहासिक ठरेल असेही मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार आणि शरद पवारांमधील वाद कसा मिटणार ? ‘या’ केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला जालीम उपाय
हेही वाचा…“मतदान करा अन् पोहे, जिलेबी फुकट खा, ” कुणी जाहिर केली ही भन्नाट ऑफर ?
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ सहा वाघांचा कार्यकारिणीत समावेश, निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेचा विस्तार
हेही वाचा…“अजित दादांवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा..,” अजित पवार गटाचा बोरवणकरांना इशारा
हेही वाचा…एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणमध्ये मनसेला मोठे खिंडार