मुंबई : शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला सुरूवातीला उतरती कळा लागली. परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दौरे सुरू केल्यानंतर अनेक नेते ठाकरे गटात सामील झालेत. शिवसेनेचे जुने जानते नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली. परंतु काही निष्ठावंत शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत असून त्यांना आता कार्यकारिणीत सामील करून घेण्यात आलं आहे.
हेही वाचा…२० तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रसंदर्भात निकाल लागणार, सर्वांचं निकालाकडे लक्ष
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे ठाकरे गटाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार करत सहा नव्या नेत्यांना तसेच उपनेते व संघटक पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू, यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई
तर उपनेते म्हणून विजय बंड्या साळवी, संजय जाधव, संजय पवार, राजूल पटेल, शीतर देवरूखकर, शरद कोळी, अस्मिता गायकवाड, शुभांगी पाटील, जान्हवी सावंत आणि छाया शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर संघटक म्हणून विलास वाव्हळ, विलास रूपवते, आणि चेतन कांबळे, तर सचिव म्हणून वरूण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रदा फातर्पेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”
दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकारिणी मंडळात मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, आणि सुनील प्रभू यांचा नेते मंडळात समावेश आहे.
शिवसेनेच्या नेतेपदी, उपनेतेपदी आणि सचिवपदी नियुती करण्यात आलेल्या लढवैय्या शिवसैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐#ShivsenaUBT #Hindutvaforever pic.twitter.com/qyq2x3rkHE
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादांवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा..,” अजित पवार गटाचा बोरवणकरांना इशारा
हेही वाचा…एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणमध्ये मनसेला मोठे खिंडार
हेही वाचा…हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या! बावनकुळे यांच आवाहन तर महेश लांडगे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
हेही वाचा…ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार
हेही वाचा…भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना महापालिकेचा मोठा दणका, ३० दिवसांची दिली मुदत