पुणे : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पुणे पालिकेने भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना नोटीस पाठवण्याने एकच खळबळ उडाली आहे. यातच येत्या ३० दिवसात बेकायदेशीर बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा पुणे महापालिकेकडून त्या जागेवरील बांधकाम पाडण्यात येईल. असा थेट इशाराही पालिकेने काकडे यांना दिल्याने पुण्यात सध्या याचीच चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
हेही वाचा…“अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार,” शरद पवारांनी अजित पवारांना लगावला टोला
पुणे महापालिकेने पाठवलेल्या नोटीसमध्ये असं म्हटलंय की, काकडे पॅलेस मंगल कार्यालय, दुसरा मजल्यावरील विनापरवाना अंदाजे २५१ चौ.मी व तिसऱ्या मजल्यावरील संपूर्ण विनापरवाना बांधकाम अंदाजे ४२० चौ.मी व्यावसायिक वापर सुरू आहे. त्यामुळे या जागेवरील ३० दिवसाच्या अगोदर बांधकाम न हटवल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल. असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा…गृहमंत्र्यांच्या नागपुरात नराधम सापडेना..! ड्रोनचा वापर, अन् 17 पोलिसांची पथके तैनात, बक्षिसही केले जाहीर
दरम्यान, पुणे पालिकेकडून नोटीस पाठवल्यानंतर संजय काकडे यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. यातच या नोटीसीची संपूर्ण शहारात एकच चर्चा सुरू असून अनेकांना याचा मोठा धक्का बसला आहे. पुणे भाजपच्या राजकारणात संजय काकडे यांचं मोठं नाव असून काकडे हे भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…२० तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रसंदर्भात निकाल लागणार, सर्वांचं निकालाकडे लक्ष
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”
हेही वाचा…“सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करणार”, भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द
हेही वाचा…Video! “एक पक्ष, एक नेता आणि एक विचार”, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी