नागपूर : चार दिवसांपूर्वी जामठ्यातील जंगलात कुऱ्हाडीचा धाक दाखवून अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला जंगलात फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु आरोपही अजूनही सापडत नसल्याने बलात्कार करणाऱ्या नराधमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोनचाही वापर सुरू केला आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
हेही वाचा…“भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर..,” राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, चित्रा वाघ यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हिंगणा व गुन्हेशाखा पोलिसांची १७ पथके बलात्कार करणाऱ्या नराधमाचा शोध घेत आहेत. दोनशेहून अधिक संशयितांची पोलिसांनी आतापर्यंत झाडाझडती घेतली आहे. परंतु आरोपीबद्दल अजूनही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याने आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यांना आता बक्षिसही जाहिर केले आहे.
हेही वाचा…सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी, सुशीलकुमार शिंदेंना मध्यस्थी करावी लागणार, काय आहे वाद ?
या घटनेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात बलात्कार झाल्यानंतर पोलिसांना गुन्हेगार सापडत नसेल, तर इतर ठिकाणांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चार दिवसांपूर्वी जामठ्यातील जंगलात कुऱ्हाडीचा धाक दाखवून अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला जंगलात फरफटत नेण्यात आले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील नराधम पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध अकरा गावांत घेण्यासाठी ड्रोन आणि नाईट व्हिजन कॅमेऱ्यांचा वापर करुनही पोलिसांच्या हाती तो लागलेला नाही. हे पोलिसांचे अपयश आहे. असंही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. देशात आणि राज्यात बलात्कारासारखे गुन्हे अत्यंत संवेदनशील ठरत असताना पोलिस यंत्रणाही या बाबतीत तितकीच सक्षम करण्यावर गृहमंत्र्यांनी जोर दिला पाहिजे. गुन्हेगार सापडत नाही फडणवीस यांच्या शहरात. हीच मोठी दुर्दैवी बाब आहे. असंही त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्र्यांच्या नागपुरात नराधम सापडेना!
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात बलात्कार झाल्यानंतर पोलिसांना गुन्हेगार सापडत नसेल, तर इतर ठिकाणांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चार दिवसांपूर्वी जामठ्यातील जंगलात कुऱ्हाडीचा धाक दाखवून… pic.twitter.com/J0EXy1PCG7
— Shivani Wadettiwar (@SVW790) October 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ब्लॅकेमेलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण,” चित्रा वाघ यांच्यावर कोणी केली टिका ?
हेही वाचा…शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंचीच तोफ धडाडणार, ठाकरेंना पालिकेने दिली परवानगी
हेही वाचा…सरकार ३ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक नेमणार, आदेश कुणाचा खिसा गरम काढण्याची काढला? सुळेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदाराचा पक्षातच अपमान, बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना झाप झाप झापले
हेही वाचा…राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्याचा मलिकांना फायदा, कोर्टाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा