मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर याही वर्षी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे वेगवेगळे दसरा मेळाव्या होणार आहे. याआधी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र यामधून शिंदे गटाने माघार केल्याने मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवतीर्थावर मेळाव्या घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी
शिवसेनेचा प्रत्येक वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आहे. परंतु मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्याने शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसीवर दसरा मेळावा पार पडला होता. मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गटामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती. परंतु मुंबई पालिकेने मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
दरम्यान, मागच्या दसऱ्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. या वर्षी राष्ट्रवादीतही फुट पडल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच मध्यंतरी राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. यावरून ठाकरे राज्य सरकारवर नेमका कोणत्या विषयावरून हल्लाबोल करणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सरकार ३ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक नेमणार, आदेश कुणाचा खिसा गरम काढण्याची काढला? सुळेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदाराचा पक्षातच अपमान, बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना झाप झाप झापले
हेही वाचा…राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्याचा मलिकांना फायदा, कोर्टाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा
हेही वाचा…“भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर..,” राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, चित्रा वाघ यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी, सुशीलकुमार शिंदेंना मध्यस्थी करावी लागणार, काय आहे वाद ?