मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वैद्यकीय जामीनावर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रिम कोर्टाने वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिकांना ३ महिने जामीन केला आहे. मलिकांच्या प्रकृत्तीत सुधार नसल्यानं जामीन मंजूर करण्याची वकिलांनी विनंती केली होती. त्यावर आता मलिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा…ललित पाटीलसाठी रूग्णालयात महिला कोण पाठवायचा ? धंगेकरांनी आणखी एक बॉ’म्ब टाकला
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय कारण सांगून नवाब मलिकांना कोर्टाकडून सुरूवातीला एक महिन्याचा जामीन मंजूर करण्यात आला होता. नंतर अजून दोन महिने वाढवण्यात आले होते. यातच प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने नवाब मलिकांच्या वकिलांनी कोर्टात जामीन वाढवून देण्यासाठी विनंती केली होती. त्यावर कोर्टाकडून त्यांना आता जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?
दरम्यान, राज्यात राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार ? याची जोरदार चर्चा सुरू होती. जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिकांच्या घरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी भेटण्याची गर्दी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्यामुळे नवाब मलिकांना जामीन मंजूर केला जात आहे का ? अशी चर्चाही दुसऱ्या बाजूला सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर..,” राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, चित्रा वाघ यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी, सुशीलकुमार शिंदेंना मध्यस्थी करावी लागणार, काय आहे वाद ?
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान