मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर याही वर्षी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे वेगवेगळे दसरा मेळाव्या होणार आहे. याआधी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र यामधून शिंदे गटाने माघार केल्याने मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवतीर्थावर मेळाव्या घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी केला आहे.
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदाराचा पक्षातच अपमान, बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना झाप झाप झापले
दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवतीर्थ मैदानासाठी परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून आता टिझर जारी केला आहे. यामध्ये एक पक्ष,एक नेता आणि एक विचार असं म्हणत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटोंचा समावेश आहे. यामध्ये शिवसेना पक्षाचा वाघाचा फोटो देखील व्हिडीओत दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्याचा मलिकांना फायदा, कोर्टाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा
दरम्यान, शिवसेनेचा प्रत्येक वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आहे. परंतु मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्याने शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसीवर दसरा मेळावा पार पडला होता. मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गटामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती. परंतु मुंबई पालिकेने मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.
एकच मैदान, शिवतीर्थ!
दसरा मेळावा २०२३#shivsena #ShivsenaUBT #दसरामेळावा2023 pic.twitter.com/mb86ExXxGj— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) October 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार,” शरद पवारांनी अजित पवारांना लगावला टोला
हेही वाचा…गृहमंत्र्यांच्या नागपुरात नराधम सापडेना..! ड्रोनचा वापर, अन् 17 पोलिसांची पथके तैनात, बक्षिसही केले जाहीर
हेही वाचा…“ब्लॅकेमेलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण,” चित्रा वाघ यांच्यावर कोणी केली टिका ?
हेही वाचा…शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंचीच तोफ धडाडणार, ठाकरेंना पालिकेने दिली परवानगी
हेही वाचा…सरकार ३ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक नेमणार, आदेश कुणाचा खिसा गरम काढण्याची काढला? सुळेंचा फडणवीसांना सवाल