पुणे : पुण्यातील ससून रूग्णालय येथील ड्रग्ज प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत आता समिती स्थापन करण्यात आली आहे. ड्रग्जप्रकरणाबाबत विरोधकांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरून विरोधकांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर आता चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय मंत्री हसन मुक्षीफ यांनी दिली आहे. तसचे येत्या १५ दिवसात सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…Video! “एक पक्ष, एक नेता आणि एक विचार”, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी
याप्रकरणाबाबत मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्याय वैद्यक शास्त्रविभाग प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबई ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार, शास्त्रविभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
हेही वाचा…“अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार,” शरद पवारांनी अजित पवारांना लगावला टोला
दरम्यान, समितीने सखोल चौकशी करून आपला सविस्तर अहवाल १५ दिवसात शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाबाबत आता अनेक नव्या गोष्टींचा उलगडा होत आहे. या घटनेमध्ये काही पोलिसांना देखील निलंबित करण्यात आले असून आरोपी अजूनही फरार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना महापालिकेचा मोठा दणका, ३० दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…२० तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रसंदर्भात निकाल लागणार, सर्वांचं निकालाकडे लक्ष
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”
हेही वाचा…“सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करणार”, भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द