पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकात मंत्री असतांना दादांनी येरवड्यातील पोली खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला. मीरा बोरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. त्यावरून आता अजित पवार गटातील नेत्यांनी यावर शंका उपस्थितीत केल्या आहेत.
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई
मीरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाही व पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाही, म्हणून केवळ प्रसिद्धीसाठी सोयीचं बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टिका करून पुस्तकाचा खप वाढवणे, मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल. असा निशाणा राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी साधला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”
दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकरणकर यांनी देखील भाष्य केलं आहे. पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी, आपण प्रसिद्धी झोतात यावं यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर खोटे आरोप केलेले आहेत. मीरा बोरवणकर यांनी यासंदर्भात पुरावे द्यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा रूपाली चाकरणकर यांनी दिला आहे.
मिरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाहीं व पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाहीं म्हणुन केवळ प्रसिद्धसाठी सोयीच बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टिका करून पुस्तकाचा खप वाढवणे, मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणमध्ये मनसेला मोठे खिंडार
हेही वाचा…हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या! बावनकुळे यांच आवाहन तर महेश लांडगे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
हेही वाचा…ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार
हेही वाचा…भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना महापालिकेचा मोठा दणका, ३० दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…२० तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रसंदर्भात निकाल लागणार, सर्वांचं निकालाकडे लक्ष