नवी दिल्ली : आगामी महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धडाका सुरू होणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझारोम आणि छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. मात्र यावेळी मध्यप्रदेशात व्यापारी संघनेने मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी भन्नाट ऑफर ठेवली आहे.
हेही वाचा…भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना महापालिकेचा मोठा दणका, ३० दिवसांची दिली मुदत
मध्यप्रदेशात आगामी महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्यातील व्यापारी संघटनेने भन्नाट ऑफर ठेवली आहे. शहरातील कोणत्याही मतदाराने सकाळच्या वेळी लवकर मतदानाचा हक्क बजावला आणि संबंधितांनी मतदानाची खूण दाखविल्यास मोफत पोहे आणि जिलेबी देण्यात येईल असे आज ५६ दुकान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुंजन शर्मा यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा…२० तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रसंदर्भात निकाल लागणार, सर्वांचं निकालाकडे लक्ष
मतदानाच्या दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंतच ही ऑफर लागू होईल. मोफत नाश्ताची वेळ होऊन गेल्यानंतर येणाऱ्या मतदारांसाठी पोहा आणि जिलेबीच्या बिलावर विशेष दहा टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत दिवसभर लागू असेल. ५६ दुकान येथील खाद्यपदार्थ प्रसिद्ध असून येथील जिलेबी आणि पोह्यांना आस्वास घेण्यासाठी इंदूरला भेट देणारे पर्यटक आवर्जून येतात. असं गुंजन शर्मा यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई
दरम्यान, मध्यप्रदेशमधील विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. २०१८ मध्ये इंदूर विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या १४.७२ लाख होती आणि ६७ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. इंदूर शहारागत पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यावेळी १५. ५५ लाख मतदार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ सहा वाघांचा कार्यकारिणीत समावेश, निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेचा विस्तार
हेही वाचा…“अजित दादांवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा..,” अजित पवार गटाचा बोरवणकरांना इशारा
हेही वाचा…एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणमध्ये मनसेला मोठे खिंडार
हेही वाचा…हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या! बावनकुळे यांच आवाहन तर महेश लांडगे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
हेही वाचा…ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार