मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजवादी जनता परिवार बैठकीत बोलतांना भाजपसह शिंदेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. जनता दल संयुक्त चे आमदार कपिल पाटील यांनी बोलवलेल्या या बैठकीला राज्यातील २१ पेक्षा अधिक समाजवादी जनता परिवारातील संघटना तसेच आरजेडी आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते उपस्थित होते.
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ सहा वाघांचा कार्यकारिणीत समावेश, निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेचा विस्तार
आता यावरून भाजपचे नेते आणि शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केलीय. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वत:च मुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊन दाखवलं. सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले. राम मंदिरावर टिका करून दाखविली. हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली. बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपूत्राने जाऊन दाखवलं. असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंवर टिका केली.
हेही वाचा…“अजित दादांवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा..,” अजित पवार गटाचा बोरवणकरांना इशारा
दरम्यान, आशिष शेलार यांनी ठाकरेंवर टिका केल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शेलारांना चांगलाचं सुनावलं. फडणवीसांनी तुमचं राजकीय क्षितीज मर्यादित केलं तरी सुद्धा भाटगिरी करताना स्तर घसरत चाललाय. कोरोना काळात जे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं ना ते तुम्हाला सामान्य परिस्थितीतही करता येत नाही. ट्विट करायची खूमखुमी असेल तर नांदेड संभाजीनगरवर बोला. असं म्हणत अंधारेंनी शेलारांना शेलाक्या शब्दात सुनावलं.
आशिष कुरेशीजी,
Ohh sorry @ShelarAshish
फडणवीसानी तुमचं राजकीय क्षितिज मर्यादित केलं तरी सुद्धा भाटगिरी करताना स्तर घसरत चाललाय. कोरोना काळात जे उद्धवसाहेबांनी करून दाखवलं ना ते तुम्हाला सामान्य परिस्थितीतही करता येत नाही. ट्विट करायची खूमखुमी असेल तर नांदेड संभाजीनगर वर बोला. pic.twitter.com/YdplNyw58g— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…दिवाळीपूर्वी मोठा राजकीय हादरा बसणार, मंत्र्यांच्या विधानाने खळबळ
हेही वाचा…“आपल्यासाठी घातक निर्णय घेणाऱ्या सरकारला घरी पाठवा,” शरद पवारांचं आक्रमकपणा पुन्हा जिंवत
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ आता पुण्यात धडकणार, पुण्यात या ठिकाणी होणार जाहीर सभा
हेही वाचा…अजित पवार आणि शरद पवारांमधील वाद कसा मिटणार ? ‘या’ केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला जालीम उपाय
हेही वाचा…“मतदान करा अन् पोहे, जिलेबी फुकट खा, ” कुणी जाहिर केली ही भन्नाट ऑफर ?