पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सनसनाटी अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. मागील एक दिवसापासून या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज पत्रकार परिषद घेऊन मीरा बोरवणकर यांनी या प्रकरणाबाबत भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा…“फडणवीसांनी राजकीय क्षितीज मर्यादित केलं तरी..,”शेलारांवर शेलक्या शब्दात ‘कुणी’ केली टिका ?
पुण्याच्या येरवडा तुरूंगाजवळील पोलीस दलाच्य ताब्यातील तीन एकराच्या मोक्याच्या जागेचा तत्कालीन दादा पालकमंत्र्यांच्या वतीने लिलाव करण्यात आला. या लिलावाप्रमाणे या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास मला पालकमंत्र्यांनी सांगितले होते. यावर आज पत्रकार परिषद घेऊन मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
हेही वाचा…दिवाळीपूर्वी मोठा राजकीय हादरा बसणार, मंत्र्यांच्या विधानाने खळबळ
अजित पवारांनी जागा हस्तांतरित करण्यास मला सांगितलं पण मी नकार दिला. हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर तुम्ही जागा द्या, असं मला अजिदादांनी सांगितलं. जागा देण्यास मी नकार दिला. बोरवणकरांनी अजितदादांवर थेट आरोप केला आहे. माझ्यामुळे येरवड्याची जागा वाचली अन्यथा बिल्डरला गेली असती. शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच. असंही मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“आपल्यासाठी घातक निर्णय घेणाऱ्या सरकारला घरी पाठवा,” शरद पवारांचं आक्रमकपणा पुन्हा जिंवत
दरम्यान, मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकाचं अनावरण आहे. या पुस्तकात त्यांनी आतापर्यंतची कारकिर्द मांडली असून यात ३८ चॅप्टर आहेत. त्यात त्यांनी येरवडा पोलिसांच्या जमीन लिलावाबाबतही सांगितलं आहे. त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. एक बिल्डर तुमच्याकडे येतो आणि तो सांगतो की जागा इथे आणि काही जागा तिथे आहे. मध्ये तुमचं पोलीस स्टेशन पडतं. तो शासनाला विनंती करतो तुम्ही तुमचं पोलीस स्टेशन हटवा आणि ही जागा मला द्या. मी तेव्हा पुणे पोलिस कमिनशर होते. आमचं म्हणणं असं होतं की पोलिसांच्या जागा त्याला देऊ नका. असंही त्या म्हणाल्या.
यातच अजित दादा यांचं नाव मी पुस्तकात कुठे घेतलं नाही. पण ते पालकमंत्री होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ही प्रक्रिया संपलेली आहे. तुम्ही हॅंडओव्हर करा. या प्रोसेसमध्ये जर आधीचे कमिशनर होते तर त्यांनी का हॅंड ओव्हर केलं नाही. मलाच तेव्हा असं का सांगण्यात आलं होतं. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबई जिंकण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, ‘या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षपदी नियुक्ती
हेही वाचा…“सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापून व्यवसाय वाढवणाऱ्या अदानीला पंतप्रधानांचा पाठिंबा”
हेही वाचा…“सुनावणीचं वेळापत्रक द्या, अन्यथा..,” कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चांगलचं फटकारलं
हेही वाचा…“अजित पवारांकडून सरकारी जमीन विकण्याचा प्रयत्न”, माजी पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“एक घंटाही वेळ वाढवून देणार नाही,” अजितदादांच्या मागणीवर जरांगे पाटलांचा घणाघात