पुणे : मुलींना शिक्षणाची दारं खुलं करणाऱ्या भिडे वाड्याच्या संदर्भातील उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला असून सरकारच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. यानंतर आता लवकरच भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होईल असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याने यश मिळालं आहे.
हेही वाचा…“एक घंटाही वेळ वाढवून देणार नाही,” अजितदादांच्या मागणीवर जरांगे पाटलांचा घणाघात
महापालिकेने हेरिटेज वास्तूंची यादी तयार करून त्यात भिडे वाड्याचा समावेश केला होता. यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २१ फेब्रुवारी २००६ साली भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत मान्यता दिली होती. परंतु हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता यावर सुनावणी घेत भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे.
हेही वाचा…“फडणवीसांनी राजकीय क्षितीज मर्यादित केलं तरी..,”शेलारांवर शेलक्या शब्दात ‘कुणी’ केली टिका ?
दरम्यान, मुलींची पहिली शाळा म्हणजे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकर होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुडे पडले आहे. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने सातत्याने प्रयत्नशील होतो.शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भीडेवाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भआत माहिती दिली होती.
हेही वाचा…दिवाळीपूर्वी मोठा राजकीय हादरा बसणार, मंत्र्यांच्या विधानाने खळबळ
उच्चन न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानुसार महाधिववक्त्यांनी उच्च न्यायालयात शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडे वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाला दिला आहे. लवकरच आता भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तेव्हा मी त्यांना नकार दिला,”अजितदादांवर आरोप करत मीरा बोरवणकरांनी सगळचं सांगितलं
हेही वाचा…मुंबई जिंकण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, ‘या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षपदी नियुक्ती
हेही वाचा…“सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापून व्यवसाय वाढवणाऱ्या अदानीला पंतप्रधानांचा पाठिंबा”
हेही वाचा…“सुनावणीचं वेळापत्रक द्या, अन्यथा..,” कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चांगलचं फटकारलं
हेही वाचा…“अजित पवारांकडून सरकारी जमीन विकण्याचा प्रयत्न”, माजी पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप