पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकात मंत्री असतांना दादांनी येरवड्यातील पोली खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितल्याचा आरोप केला. मीरा बोरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. त्यावरून आता अजित पवार गटातील नेत्यांनी यावर शंका उपस्थितीत केल्या आहेत.
हेही वाचा…“सुनावणीचं वेळापत्रक द्या, अन्यथा..,” कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चांगलचं फटकारलं
पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी, आपण प्रसिद्धी झोतात यावं यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजितदादांवर हेतुपुरस्पर खोटे आरोप केले आहेत. अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे मीरा बोरवणकर यांनी सादर करावे, अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात कायदेशीर मानहानीचा दावा दाखल करेल. तसेच इतक्या दिवसांनंतर आताच मीरा बोरवणकर यांच्या या आरोपाची भाषा पाहता, यांचा बोलविता धनी कोण ? या गोष्टीची देखील चौकशी व्हावी, असं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“एक घंटाही वेळ वाढवून देणार नाही,” अजितदादांच्या मागणीवर जरांगे पाटलांचा घणाघात
दरम्यान, मीरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाहीं व पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाही, म्हणुन केवळ प्रसिद्धसाठी सोयीच बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टिका करून पुस्तकाचा खप वाढवणे, मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल. असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी,आपण प्रसिद्धी झोतात यावं यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजितदादांवर हेतुपुरस्पर खोटे आरोप केलेले आहेत.
आदरणीय ना.अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे मिरा बोरवणकर यांनी सादर करावे.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या विरोधात…— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आघाडी धर्म पाळण्यासाठी त्यांचं ऐकावं लागेल असं सांगण्यात आलं,” मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौफ्यस्फोट
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर,” उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला
हेही वाचा…“तेव्हा मी त्यांना नकार दिला,”अजितदादांवर आरोप करत मीरा बोरवणकरांनी सगळचं सांगितलं
हेही वाचा…मुंबई जिंकण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, ‘या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षपदी नियुक्ती
हेही वाचा…“सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापून व्यवसाय वाढवणाऱ्या अदानीला पंतप्रधानांचा पाठिंबा”