मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास दिरंगाई करत असल्याची तक्रार ठाकरे गटाकडून कोर्टात मांडली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारत सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करण्यास सांगितलं होतं. त्यावर आज पुन्हा कोर्टात सुनावणी होत असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांना काय आदेश देणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“तेव्हा मी त्यांना नकार दिला,”अजितदादांवर आरोप करत मीरा बोरवणकरांनी सगळचं सांगितलं
राष्ट्रवादीच्या ४० आणि शिवसेनेच्या ४० आमदारांना राहुल नार्वेकर यांना कायदेशीर दृष्ट्या अपात्रच कराव लागणार आहे. नार्वेकरांच्या वेळापत्रकाचं लफंगेगिरी असून ते चोऱ्यांचे सरदार म्हणून काम करीत आहेत की संविधानाचा रखवालदार म्हणून काम करू इच्छितात हे त्यांनी ठरवायला हवंय जर चौकीदार चोर आहे तर संविधान पीठावर बसलेले नेते चोर आहे अशी म्हणण्याची वेळ महाराष्ट्रवर येऊ नये. आपल्या विधानसभा अध्यक्षांनी इतका अपमान केला आहे की, न्यायालयाने त्यांना रोज फासावर लटकायला हवं. असा घणाघात देखील संजय राऊतांनी चढवला.
हेही वाचा…मुंबई जिंकण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, ‘या’ नेत्याची केली मुंबई शहाराध्यक्षपदी नियुक्ती
दरम्यान, विधिमंडळाचं सार्वभौमत्व राहुल नार्वेकर सांगत आहेत. चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून संरक्षण दिलं जातंय. चोरांना, दरोडेखोरांना सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील. तर त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात नोंदवलं जाईल. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालय निर्देस दिले आहेत. नार्वेकर मात्र टाईमपास सिरीअल बनवत आहेत. हे लोक लफंगे आहेत. हे लोकं चोरी करून दुसऱ्याच्या घरात घुसले आहेत. विधानसभा अध्यक्ष मात्र या चोरांना संरक्षण देत आहेत. असं म्हणत राऊतांनी नार्वेकरांवार निशाणा साधला.
READ ALSO :
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर, चंद्रकांत पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश”, हेमंत रासने
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालय आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार
हेही वाचा…“मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण? याचीही चौकशी व्हावी,” अजित पवारांसाठी नेते सरसावले
हेही वाचा…“आघाडी धर्म पाळण्यासाठी त्यांचं ऐकावं लागेल असं सांगण्यात आलं,” मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौफ्यस्फोट
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर,” उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला