मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर राज्यात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून अजित पवारांना कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे वाट्याला येणाऱ्या सर्व जागा जिंकून आणण्यासाठी अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत एक वेगळीच रणनीती आखली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“नाही तर वेळापत्रक काढण्याचा आम्ही आदेश देऊ शकतो”, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारत दिला इशारा
सुरूवातीपासून बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याठिकाणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. विशेष करून या मतदारसंघावर भाजपचा पहिल्यापासून डोळा असून अजित पवारांच्या मुळे ही जागा महायुतीला यावी, अशी चर्चा सुरू आहे.
दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटातील नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात नितीन पाटलांना संधी मिळू शकते.
हेही वाचा…“समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय”, वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगरात खासदार इत्मियाज जलील यांच्याविरोधात विधान परिषदेतील आमदार सतिश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचना पक्षांनी दिल्याची माहिती आहे. तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उतरवलं जाणार असून त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दोन बैठकां देखील झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणावर विखे पाटलांचा तिखट वार, जरांगे पाटलांच्या ‘त्या’ भूमिकेवर घेतला आक्षेप
दरम्यान, महाराष्ट्रातील ४८ जागापैंकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प भाजपने घेतला आहे. यापैकी २२ लोकसभा मतदारसंघावर सुरूवातीपासून भाजपने दावा सांगितला आहे. तर १८ जागासाठी शिवसेनेच्या शिंदे गट आग्रही आहे. उर्वरित जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.त्यामुळे वाट्याला आलेल्या जागा जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरागेंच्या अल्टिमेटला फक्त सात दिवस बाकी, मंत्रालयात मंत्र्यांची मोठी धावपळ
हेही वाचा…“दादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला टाकला की काहींना काही विघ्न येतातच”,आधी धरण अन् आता जमीन पाठ सोडेना
हेही वाचा…“चौकशी करा किंवा अन्य काही करा,फरक पडत नाही”, बोरवणकरांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले
हेही वाचा…“ड्र्ग्जप्रकरणाबाबत नाशकात महत्वाची बैठक,” दादा भूसेंनी दिले कठोर कारवाई करण्याचे आदेश