मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ED कडून नोटीस बजावण्यात आली आहे. 55 लाखाच्या व्यवहाराप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र वर्षा राऊत आज ED कार्यालयात चौकशीला जाणार का?, याबाबत अद्याप निर्णय झालेला तसे स्पष्टीकरणही मिळाले नाहीये.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप वर टीका केली हि सगळी राजनीती असल्याचे पुनोरुच्चार त्यांनी केले. तसेच ईडीची नोटीस मी पहिली नाही आणि मला ती पहायची देखील गरज वाटत नाही. असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून चौकशीला अधिकचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. पण असं कुठलंही पत्र EDला पाठवण्यात आलं नाही. तसेच वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते.