मुंबई : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी शिंदेंना साथ दिली तर काही ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले. त्यातील शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मी शेवटपर्यंत शिवसेनेत असून उद्धव ठाकरेंसोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
“वेळ पडली तर आम्हाला गोळ्या घालून ठार मारा, मात्र…;” मिटकरींचा भाजपला आवाहन
जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनोहर जोशी देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या माध्यमांसमोर येत होत्या. त्यावर आज त्यांनी पुर्णविराम दिला. माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेना प्रमुख हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पुर्व करू शकलो याचं समाधान असल्याचंही मनोहर जोशी यांनी टीव्ही9 शी बोलतांना सांगितलं.
“शिवाजी महाराजांचा अपमान करणे हा भाजपचाच अजेंडा”; सेनेची भाजपवर जहरी टिका
त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, माजी लोकसभा अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांना वाढदिवसानिमित्त मन: पुर्वक शुभेच्छा, परमेश्वर आपणास निरोगी व दीर्घायुष्य प्रदान करो हीच प्रार्थना. असं त्यात त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “जितका चिखल, तितकेच कमळ अधिक फुलणार”; नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसला प्रत्युत्तर
- “उद्धव ठाकरे आणखी 2.5 वर्ष राहिले असते, तर त्यांचे केवळ 20 आमदारचं निवडून आले असते”
- “चंद्रकांत खैरे पिसाळलेले वक्तव्य करताहेत”; 5 कोटीच्या आरोपावर शिंदे गटाची प्रतिक्रिया
- “तुम्ही वेगळी ओळख करायला जाता अन् घोटाळा होतो”; आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार
- “पैसे खर्च करून आदित्य ठाकरे माणसं आणतायेत”; संजय गायकवाडांची टिका