नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा दुसरा टप्पा 4 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील जवळपास 89 मतदार संघातील मतदान पुर्ण झालं आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार सभा गुजरातमध्ये होत असून काॅंग्रेसही जोरदार प्रचार करीत आहेत. यातच काॅंग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी मोदींची तुलना रावणांशी केल्याने मोदींना आता खर्गेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
“शिवाजी महाराजांचा अपमान करणे हा भाजपचाच अजेंडा”; सेनेची भाजपवर जहरी टिका
अहमदाबादच्या सभेत सोमवारी मलिकार्जून खर्गे यांनी मोदींची रावणाशी तुलना केली. ते म्हणाले की, मोदींची रावणासारखी 100 तोंडे आहेत का ? मला कळत नाही. रविवारी सुरतमधील जाहीर सभेत खर्गे यांनी स्वत: ला अस्पृश्य आणि पंतप्रधान मोदी हे खोटे बोलणारे नेते असल्याची टिकाही त्यांनी केली होती. त्यावरून आता प्रचारामध्ये मोदींनी खर्गे आणि काॅंग्रेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
अलिकडे काॅंग्रेस नेत्यांमध्ये मला शिवीगाळ करण्याची स्पर्धा लागली आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जितका चिखल टाकला जाईल. तितकेच कमळ अधिक फुलणार आहे. असं प्रत्युत्तर मोदींनी गुजरातमधील पंचमहाल प्रांतातील कलोल येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
“मंगल प्रभात लोढांनी दिलगिरी व्यक्त केली, विषय संपला”; सुप्रिया सुळे
दरम्यान, पुढे बोलताना मोदी म्हणाले की, भगवान रामाचे अस्तित्व आणि अयोध्येत बनविले जात असलेल्या मंदिरावर काॅंग्रेसचा विश्वास नाही. एवढेच नाही तर काॅंग्रेसचे लोक तर रामसेतूचा देखील विरोध करतात. पण मला शिव्या देण्यासाठी ते रामायणातील रावणाचा उल्लेख करतात. काही दिवसांपुर्वी काॅंग्रेसच्या एका नेत्याने पीएम मोदी कुत्ते की मौत मरेगा असे वक्तव्य केले होते. तर कोणी म्हणाले की मोदी हिटलर की मौत मरेगा, तर कोणी रावण म्हणून राक्षस म्हणते. तर कोणी झुरळ म्हणून मला हिणवत आहेत. पण मी त्यांची चिंता करीत नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “उद्धव ठाकरे आणखी 2.5 वर्ष राहिले असते, तर त्यांचे केवळ 20 आमदारचं निवडून आले असते”
- “चंद्रकांत खैरे पिसाळलेले वक्तव्य करताहेत”; 5 कोटीच्या आरोपावर शिंदे गटाची प्रतिक्रिया
- “तुम्ही वेगळी ओळख करायला जाता अन् घोटाळा होतो”; आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार
- “पैसे खर्च करून आदित्य ठाकरे माणसं आणतायेत”; संजय गायकवाडांची टिका
- “वेळ पडली तर आम्हाला गोळ्या घालून ठार मारा, मात्र…;” मिटकरींचा भाजपला आवाहन