मुंबई : दसरा मेळाव्यानिमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टिका केली. विशेष करून त्यांनी दादा भुसे, रामदास कदम, गुलाबराव पाटील तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी कडाडून प्रहार केला. यानंतर आता बंडखोर आमदारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि बंडखोर आमदार शंभुराज देसाई यांनी त्यांचा खुरपुस समाचार घेतला.
“शिंदेंचं भाषण म्हणजे भाजपने लिहून दिलेली रटाळ बोअर क्रिप्ट”
शंभुराज देसाई म्हणाले की, एक महिन्यापुर्वी त्या पक्षात आल्या आणि उपनेत्या झाल्या आणि आता जर जुन्या आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना त्या निष्ठा शिकवणार असतील तर त्यासारखं दुर्दैव कोणतंही नाही. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुणी राहिलेलं नाही. कारण जो आज येईल त्याला पद मिळतं. आज जो येईल त्याला थेट मातोश्रीवर प्रवेश मिळतो. असं देखील देसाई यांनी म्हटलं.
“सगळे वाईट, तुम्ही एकटेच चांगले का ?” मनसेचा ठाकरेंना खोचक सवाल
त्या प्रचार करायला मोकळ्या आहेत. त्यांनी यावं त्यांनी आपला प्रचार करावं. लोकांना जे वाटेल पटेल ते करतील. काल आमच्या मतदार संघातील खुल लोक मुंबईत आली. एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी चारशे ते पाचशे किलोमीटरच्या अंतरावरून लोक स्व: खर्चातून आलेत. इतकी लोक आमच्यावर विश्वास ठेऊन आमच्या भूमिकेला पाठिंबा देत असतील तर अंधारेताईंनी त्यांच काम करून जावं. असं आव्हान देखील त्यांनी केलं आहे.
सुषमा अंधारेंनी शिवतीर्थ गाजवलं..! नारायण राणे, फडणवीसांना धो धो धुतलं
दरम्यान, सुषमा अंधारे ह्य़ा आता महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. बंडखोर आमदारांच्या प्रत्येक मतदार संघात जाऊन त्या प्रचार करणार आहेत. त्याआधी शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील निष्ठा यात्रा काढली होती. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
Read also
- ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच ; राष्ट्रवादीचा आरोप
- दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासुराचं शिवाजी पार्कवर दहन
- “तुम्हाला कसं काय जमतं बुवा ?” शितल म्हात्रेंचा सुषमा अंधारेंना खोचक टोला
- “….त्यात निरागसतेला ओढू नका हो..!”; शिवतीर्थावरील टिकेनंतर श्रीकांत शिंदेंच उद्धव ठाकरेंना पत्र
- एसटीच्या बुकिंगकरिता 10 कोटीची कॅश कशी घेतली.? कोणी दिली? याची इडी चौकशी करणार का?