मुंबई : शिवसेनेचे नेते आणि रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या स्वतःच्या गावात त्यांच्याच खात्यात घोटाळा झाला असून हा घोटाळा राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी समोर आणला आहे. रोजगार हमी अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार चक्क कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
औरंगाबाद-बीड हायवे ते साजेगाव रोड या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम कामगारांनी नव्हे तर जीसीपी आणि पोकलेनेच्या साह्याने करण्यात आले आहे. मात्र कागदोपत्री बोगस नाव दाखवण्यात आल्याचं आरोप गोर्डे यांनी केला आहे. एवढच नाही तर, रस्त्याच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी केला आहे. हा प्रकार तेथिल राष्ट्रवादीचे स्थानिक नेते दत्ता बोर्डे यांनी उघडकीस आणला आहे.
औरंगाबाद-बीड बायपास कामात, रोजगार हमी योजनेवर बोगस कामगार दाखवून बील उकळण्याचं गंभीर प्रकरण समोर आलं असून, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. @CMOMaharashtra pic.twitter.com/t2o4FNvdFA
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 22, 2021
प्रविण दरेकर यांनी चौकशीची मागणी करत म्हटले आहे की, मंत्री संदीपान भुमरे यांचे चिरंजीव जिल्हापरिषदेचे सदस्य आहेत. शिवाय मंत्री संदीपान हे देखिल त्या कामामध्ये होते. कामगाराची नावे बदलुन केलेप्रकरण अत्यंत निंदनीय आहे. खरतर “कुंपनचं शेत खायला लागल तर आपण अपेक्षा कोणाकडे करणारं”, असे म्हणतं मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
चोर चोर मावसभाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ अस महाखाऊ सरकार https://t.co/22wFx92NK4
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 22, 2021
संदीपान भुमरे काय म्हणाले..!
हे प्रकरण मला आत्ताच कळाले आहे, त्यामुळे संबंधित प्रकरणाची माहिती घेत आहे.जर यात कुणी दोषी आढळत असेल तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. मी किंवा आमचं सरकार कधीच भ्रष्टाचारसारखे गोष्टींचा समर्थन करणार नाही.