पुणे : मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली. एक राजा तर बिनडोक आहे, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंवर टीका केली. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. दवे म्हणाले की, जातीय आरक्षण रद्द करा अशी मागणी केली म्हणून जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल. प्रकाश आंबेडकरांना उदयनराजेंचं मत पटलेलं नसेल तर त्यांनी आरक्षणाबाबत जनमत घ्यावे.
दवे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना लोकभावनेचा अनुभव घ्यायचाच असेल तर संपूर्ण देशभरात एकदा आरक्षणावर मतदान मतदान घेण्याची मागणी त्यांनी करावी, आम्ही त्यास पाठिंबा देऊ. आरक्षणाच्या चतकोर भाकरीने, त्यावर खेळल्या गेलेल्या राजकारणाने, कायदेशीर लढाईने आजचा युवक चिंताग्रस्त झाला आहे. आरक्षण कोणाचेही, कोणतेही समाधान करण्यात अपयशी ठरलं आहे. अशावेळी जनतेत जाऊनच आता लोकांची मते तपासावी. आम्हाला खात्री आहे की, निम्म्यापेक्षा जास्त नागरिक जातीय आरक्षणाच्या विरोधातच मतदान करतील.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “एक राजा तर बिनडोक आहे, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय”.
तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही”.
Read Also :
‘या’ भीतीमुळे भाजपने गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट नाकारले,अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोटhttps://t.co/dhpf7YiwoF#GupteshvarPande #anildeshmukh @AnilDeshmukhNCP @ips_gupteshwar #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 8, 2020