जुन्नर: आज शिवजयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात पार पडला. यावेळेसच्या सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
हे पण वाचा, “विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलं त्यामुळेचं आपण आहोत. ४०० वर्षांपूर्वी महाराजांनी घडलेला सुवर्ण इतिहास आजही ध्यानीमनी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हे आपल्या पिढी-दरपिढी रुजत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पिढ्यान पिढ्या आपल्याला प्रेरणा देत आहेत आणि पुढंही देत राहणार हे आपल्याला मान्यच करावं लागणार आहे.
हे पण वाचा, शिवनेरी वरील शिवजन्मोत्सवाला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची ‘दांडी’
किल्ले-विकासासंदर्भात देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे. पुरातत्व विभाग असेल किंवा बांधकाम विभाग असेल त्यांना सर्वांना सांगण्यात आलं आहे की किल्ल्यांच्या संदर्भात जे काही बांधकाम होईल ते पुरातन काळाप्रमाणेच होणार अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ३३ कोटींचा निधी शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी देण्यात आला आहे. सध्या कोरोनाचे सावट असल्याने सर्वांना इथं आमंत्रित करण्यात आलं नाही त्यामुळे क्षमा मागतो. लवकरच कोरोनाचे निर्बंध हटवण्यात येतील अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.
हे पण वाचा, कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
मराठा आरक्षणाबद्दल देखील अजित पवारांनी माहिती दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही विधिमंडळात आम्ही ठराव मंजूर करून घेतला होता. मात्र उच्च न्यायालयामध्ये ५० टक्के आरक्षणाची तरतूद असणारा कायदा असल्याने तिथं केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि कायद्यामध्ये बदल करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी देखील अजित पवारांनी केली आहे. यावेळी उपस्थितांमधील एका व्यक्तीला देखील अजित पवारांनी चांगलेच झापले आहे. तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे का ? असा संतप्त सवालही अजित पवारांनी विचारला. आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना घेऊन स्वराज्य उभं केलं होतं. त्यामुळे इतरही जाती-धर्माचा विचारही करावा लागतो असं देखील त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
हे पण वाचा,
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुण्याचा दौरा; मुरलीधर मोहोळांच्या ‘राजकीय’ वजनात होणार वाढ
शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा