नवी दिल्ली: लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनी सैनिकांनी पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला. यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
रणदीप सुरजेवाला हे आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, ‘देशाची जमीन बळकावण्याचे ही नवी हिम्मत,
रोज़ नई चीनी घुसखोरी
पांगोंग सो सरोवर परिसर,
गोगरा आणि गलवान खोरे,
डेपसंग प्लॅनस,
लिपुलेख,
डोका लॉ आणि नाकु लॉ पास.
लष्कर तर भारतमातेच्या रक्षणासाठी निरडपणे उभे आहे,
पण मोदीजींचे “लाल आँख” कधी दिसणार?’
आए दिन भारत की संप्रुभता पर हमला हो रहा है,
आए दिन हमारी सरज़मीं पर क़ब्ज़े का दुस्साहस,
आए दिन देश की धरती पर चीनी घुसपैठ,
मोदी जी, पर “लाल आँख” कहाँ हैं,
चीन से आँखों में आँखें डाल कब बात होगी,
पी.एम मौन क्यों हैं?#indiachinastandoff pic.twitter.com/r4zX9jYRRO
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) August 31, 2020