नवी दिल्ली : अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून उभे असलेले चारही संसद सदस्य विजयी झाले आहेत. डॉ अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती अशी त्यांची नावे आहेत. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये या चौघांची फेरनिवड झाली आहे.
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मूळ भारतीय वंशाचे मतदार हा एक मोठा राजकीय फोर्स म्हणून पहिल्यांदाच उदयाला आला आहे. तेथे भारतीय वंशाचे एकूण 18 लाख मतदार आहेत. या मतदारांना आकर्िर्षत करण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न केले होते. भारतीय वंशाच्या खासदारांसाठी सामोसा कॅकस असे नाव कृष्णमूर्ती यांनी प्रचलित केले होते. हे नाव तेथे चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
यंदा प्रथमच डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस या मूळ भारतीय वंशाच्या महिलेची उपाध्यक्षपदासाठी निवड जाहीर केली आहे, हाही तेथे एक लक्षणीय मुद्दा ठरला होता. यावेळच्या निवडणुकीत राजा कृष्णमूर्ती या 47 वर्षीय भारतीय उमेदवाराने प्रिस्टन नेल्सन यांचा एकतर्फी पराभव केला.
Read Also :
“देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो”
“पोपट पाळण्याची सवय शिवसेनेलाच”; चंद्रकांत पाटलांनी दिले प्रत्युत्तर
‘..तेव्हा भाजपा नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवत नाही’; फडणवीसांना रोहित पवारांचा टोला